आयसीयू बेडच्या कमतरतेमुळे पाचशे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:22 AM2021-05-06T04:22:39+5:302021-05-06T04:22:39+5:30
अहमदनगर : संचारबंदी, कडक लॉकडाऊन केल्यानंतरही कोरोनाची साखळी तुटत नसल्याचे दिसत आहे. एप्रिल महिन्यातच ६९१ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
अहमदनगर : संचारबंदी, कडक लॉकडाऊन केल्यानंतरही कोरोनाची साखळी तुटत नसल्याचे दिसत आहे. एप्रिल महिन्यातच ६९१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १८ टक्के रुग्ण हे आयसीयूमध्ये उपचार घेत होते, तर ज्यांना आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळाले नाही, त्यामुळे त्यांना साध्या बेडवर उपचार घ्यावे लागले. उपचार होऊ न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, अशा कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या ही पाचशेच्या वर असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यामध्ये कोविड केअर सेंटर वाढले, कोविड हॉस्पिटलची संख्याही वाढली. जिल्ह्यात तब्बल १६ हजारांपेक्षा जास्त बेड सज्ज आहेत. मात्र, त्याहीपेक्षा सक्रिय रुग्णांची संख्या २२ हजार आहे. त्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक रुग्णांना बेड मिळत नसल्याची जिल्ह्यात स्थिती आहे. त्यातील लक्षणे नसलेले कोरोनाबाधित घरातच राहून उपचार घेत आहेत, तर गंभीर रुग्णांवर आयसीयू, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात आयसीयूपेक्षा आयसीयू न मिळालेल्या रुग्णांचे मृत्यू जास्त आहेत. त्यांना वेळेत उपचार सुविधा न मिळाल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे. या बाबीला मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणताही दुजोरा दिला नाही.
---------------
चार महिन्यांतील मृत्यू
बेड मृत्यू प्रमाण (टक्के)
आयसीयू १७० १८ टक्के
कॅज्युअल्टी २०० १८ टक्के
साधे बेड ५७१ ६४ टक्के
----------------
साध्या बेडवरील मृत्यूला जबाबदार कोण ?
जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात कोविड केअर सेंटरमध्ये १३ हजार ८२ बेड उपलब्ध आहेत, तर जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात ६८०, तर कोविड हॉस्पिटलमध्ये ५ हजार ४८२ बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्यात फक्त ३३६ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. सध्या ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, ते मिळत नसल्याने उपचारात अडथळे येत आहेत, तसेच जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने शंभर रुग्णांना पाहण्यासाठी एक ते दोन नर्स, आरोग्य कर्मचारी आहेत. त्यामुळे एखाद्या रुग्णाला कोणत्या उपचाराची गरज आहे, ते लक्षात येईपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रकारही घडले आहेत.
-------------
ग्रामीण भागात अंगावर दुखणे काढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर आहेत. स्थानिक ठिकाणी उपचार घेतल्यानंतर व रुग्ण गंभीर झाल्यानंतर नगरमधील रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णाची प्रकृती अत्यंत गुंतागुंतीची झालेली असते, त्यामुळे उपचार करेपर्यंत रुग्णाचा मृत्यू होतो. उपचार करण्यात कोणतीही कसूर ठेवली जात नाही.
-आरोग्य यंत्रणेतील अधिकारी
---
नेट डमी
आयसीयू
डीईए
०३ डेथ ईन आयसीयू डमी