पाचशे क्वारंटाइन बजावणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:53 AM2021-01-13T04:53:42+5:302021-01-13T04:53:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यातील पाचशे कोरोना पॉझिटिव्ह आणि क्वारंटाइनमध्ये असलेल्या रुग्णांनाही मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यांच्यासाठी ...

Five hundred quarantines will be exercised | पाचशे क्वारंटाइन बजावणार मतदानाचा हक्क

पाचशे क्वारंटाइन बजावणार मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्ह्यातील पाचशे कोरोना पॉझिटिव्ह आणि क्वारंटाइनमध्ये असलेल्या रुग्णांनाही मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यांच्यासाठी शेवटचा अर्धा तास मतदानासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. हँडग्लोव्ज, मास्क आणि सर्व नियमांचे पालन करून अशा नागरिकांना मतदान करता येणार आहे. शेवटच्या अर्ध्या तासात मतदान केंद्रावर विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील ५३ ग्रामपंचायती बिनविरोध पार पडल्या आहेत, याशिवाय १ हजार ३२६ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामध्ये आता ५ हजार ७९६ जागांसाठी मतदान होणार आहे.

---

थर्मल स्क्रीनिंग, सॉनिटायझरची व्यवस्था

मतदान केंद्रावर कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून मतदान प्रक्रिया पार पाडण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळ‌े मतदारांना मास्क घालूनच मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय हाताला सॉनिटायझर स्प्रे मारला जाणार आहे, तसेच थर्मल स्क्रीनिंगही केले जाणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सर्व संबंधित तहसीलदारांना आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली.

-------------

मास्क असताना ओळख पटणार का?

मतदाराला केंद्रावर येताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करायचे आहे. त्यामुळे त्याला तोंडाला मास्क लावूनच मतदान केंद्रात प्रवेश करायचा आहे. मात्र, तोंडाला मास्क असल्यानंतर ओळख कशी पटविणार? अशा प्रश्न आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदाराची ओळख पटविणे आव्हानच राहणार आहे. ओळख पटविताना शंका आल्यास मतदाराला मास्कही काढावा लागणार आहे. यावेळी योग्य अंतर राखून मतदाराला ओळख द्यावी लागणार आहे. मतदान केंद्रावर सामाजिक अंतर राखूनच मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

---------------

क्वारंटाइनसाठी वेळ राखीव

१५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० ही मतदानाची वेळ असणार आहे. पझिटिव्ह किंवा क्वारंटाइन असलेल्या रुग्णांसाठी शेवटचा अर्धा तास मतदानासाठी राखीव असणार आहे. याबाबत सर्व यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात मतदान असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पाचशेच्या वर कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मात्र, त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याने ते त्यांच्या घरामध्येच क्वारंटाइन आहेत, अशांना मतदान करण्यास परवानगी दिली असून, शेवटचा अर्धा तास त्यांच्यासाठी राखीव असणार आहे.

---------------

मतदारांना थर्मल स्क्रीनिंग करूनच मतदान कक्षात पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझरची व्यवस्था करण्याबाबत सर्व संबंधित तहसीलदारांना कळविण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत तहसील यंत्रणाच संपूर्णपणे कार्यवाही करणार आहे. नियमांचे पालन करण्याबाबत सर्वांनाच काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

- उर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल)

---------

आकडे आहेत.

डमी- १२ क्वारंटाइन ग्रामपंचायत वोटर डमी

फोटो- कोरोना (१), कोरोना, सॅनिटायझर

Web Title: Five hundred quarantines will be exercised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.