साई संस्थान रुग्णालयाला पाच लाखांचे साहित्य भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:20 AM2021-04-13T04:20:36+5:302021-04-13T04:20:36+5:30
साई संस्थानच्या कोविड सेंटर, रुग्णालय यांना भेट दिलेल्या साहित्यात ऑक्सिजन मशीन, वाफेचे मशीन हॅण्डग्लोज, मास्क व अन्य साहित्य व ...
साई संस्थानच्या कोविड सेंटर, रुग्णालय यांना भेट दिलेल्या साहित्यात ऑक्सिजन मशीन, वाफेचे मशीन हॅण्डग्लोज, मास्क व अन्य साहित्य व साईबाबा हॉस्पिटला दिलेल्या साहित्यात वाफेचे मशीन याचा समावेश आहे.
द्वाराकामाई आश्रमाला दहा वाफेचे मशीन तसेच ऑक्सिजन मशीन डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णांना अल्पदरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. या माध्यमातून आलेली सपूर्ण रक्कम श्री साईबाबा कोविड सेंटरला खर्च केली जाणार आहे. सदर वैद्यकीय मदतीसाठी राहुल गोंदकर, महेश महाले, संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले आहे. साहित्य घेण्यासाठी सरला बेटाचे मंहत रामगिरी महाराज, खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना पदाधिकारी, हाॅटेल मालक, साईभक्त यांनी आर्थिक सहकार्य केले आहे. याप्रसंगी शिर्डी सेवा सोसायटीचे अध्यक्ष दिगंबर गोंदकर, श्री साईबाबा हाॅस्पिटलचे अधीक्षक डॉ. प्रितम वडगावे, डॉ. मंगेश गुजराथी, शिवसेना नेते कमलाकर कोते, तालुकाप्रमुख संजय शिंदे, शहर प्रमुख सचिन कोते, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चौघुले उपस्थित होते.