नगरमध्ये प्रवाशांना लुटणारे पाच दरोडेखोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 03:23 PM2017-11-14T15:23:42+5:302017-11-14T15:28:36+5:30

नगर शहर व परिसरात प्रवाशांना लुटणा-या दरोडेखोरांच्या दोन वेगवेगळ्या टोळ्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री जेरबंद केल्या आहेत. यामध्ये एकूण पाच आरोपींना अटक करत त्यांच्याकडून हत्यारांसह ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Five robbers robbed of the passengers in the city | नगरमध्ये प्रवाशांना लुटणारे पाच दरोडेखोर जेरबंद

नगरमध्ये प्रवाशांना लुटणारे पाच दरोडेखोर जेरबंद

अहमदनगर : नगर शहर व परिसरात प्रवाशांना लुटणा-या दरोडेखोरांच्या दोन वेगवेगळ्या टोळ्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री जेरबंद केल्या आहेत. यामध्ये एकूण पाच आरोपींना अटक करत त्यांच्याकडून हत्यारांसह ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नगर-पाथर्डी रोडवर प्रवाशांचा पाठलाग करून चोरटे लूटमार करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना मिळाली होती. माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह पथकाने नगर-पाथर्डी रोडवरील बाराबाभळी परिसरातील नदीच्या पुलावर सापळा लावला. यावेळी प्रवाशांना लुटताना पथकाने समीरखान नसीरखान पठाण (वय ३३ रा. खंडाळा), बु-हाण दिलावरखान पठाण (वय ४० रा. दोघे ता. वैजापूर, जि़ औरंगाबाद) व संतोष अण्णा सोनवणे (वय २० रा. लोणी बु़ ता. वैजापूर) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन तीन जण पळून गेले़ पकडलेल्या चोरट्यांकडून एक लोखंडी कत्ती, एक लोखंडी कटावणी, दोन मोटारसायकल व तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. चोरट्यांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुस-या कारवाईत पथकाने सुपा एमआयडीसी परिसरातून रस्ता लूट करणा-या दोघा सराईत गुन्हेगारांना अटक केली. आदि उर्फ लक्ष्मण कर्डिले (वय २५ रा़ वडझिरे ता़ पारनेर) व पप्पी उर्फ मनिष अशोक सांगळे (शहांजापूर ता़ पारनेर) अशी आरोपींची नावे आहेत़ कर्डिले व सांगळे यांच्यावर कोतवाली, एमआयडीसी यासह बाहेरील जिल्ह्यातील आळंदी, यवत, वारजे, नेकनूर, धारूर, वडगाव आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत़ नगर रेल्वे स्टेशन परिसरात एका प्रवाशाला व चांदणी चौक येथून एका प्रवाशास बोलेरो जीपमध्ये लिफ्ट देऊन त्यांची लूट केल्याची कबुली आरोपींनी दिली़ आहे.

Web Title: Five robbers robbed of the passengers in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.