अकोलेत दोन दिवसांत पाच दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:14 AM2021-03-29T04:14:22+5:302021-03-29T04:14:22+5:30
अकोले : शहरात शुक्रवारी तीन व शनिवारी पाच दुकाने सील करत अकोले नगरपंचायतीने कारवाईचा बडगा उगारला आहे. कोरोना प्रादुर्भाव ...
अकोले : शहरात शुक्रवारी तीन व शनिवारी पाच दुकाने सील करत अकोले नगरपंचायतीने कारवाईचा बडगा उगारला आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायत व तालुका महसूल प्रशासन सजग झाले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही लोक प्रशासनाचे ऐकत नसल्याने आता दंड करण्यापेक्षा कारवाई करण्यावर नगरपंचायतीने भर दिला आहे.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नियमाचे उल्लंघन करणारी दुकाने सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पाच दुकाने विना मास्क व सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझर याची अंमलबजावणी नसल्याने सील केली आहे. शुक्रवारी तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी शहारातील पेट्रोल पंपासमोरील इलेक्ट्रॉनिक्स दुकान, एक मेडिकल, सेंट्रल बँकेचे ग्राहक सेवा केंद्र अशा तीन दुकानांवर कारवाई केली. तर शनिवारी पान शॅाप व मोबाईल रिपेअरिंग दुकान अशा पाच दुकानांवर कारवाई करीत सील केले आहे.
....
अकोले शहरात व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र नागरिक निष्काळजीपणे वागताना निदर्शनास येत आहे. विनाकारण अनेक ठिकाणी गर्दी करण्यात येते. दुकानदारांवर दंडात्मक कारवाईचा काही परिणाम होत नाही असे निदर्शनास आले. यामुळे नगरपंचायत शहरात दंडात्मक कारवाईपेक्षा दुकाने सील करण्यावर भर देणार आहे.
-विक्रम जगदाळे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, अकोले.