लॉकडाऊनमध्येही पाच हजार जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:21 AM2021-04-11T04:21:25+5:302021-04-11T04:21:25+5:30

शनिवार व रविवार असे दोन दिवस कडक लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार बंद आहेत. शनिवारी लॉकडाऊन असले तरी प्रशासनाने एकूण ...

Five thousand people were also vaccinated in the lockdown | लॉकडाऊनमध्येही पाच हजार जणांचे लसीकरण

लॉकडाऊनमध्येही पाच हजार जणांचे लसीकरण

शनिवार व रविवार असे दोन दिवस कडक लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार बंद आहेत. शनिवारी लॉकडाऊन असले तरी प्रशासनाने एकूण ३९ केंद्रांवर लसीकरण सुरू ठेवले होते. या सर्व केंद्रांवर दिवसभरात ५,२५० लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४ हजार ९५१ डोस (९४ टक्के) देण्यात आले. यात सर्वाधिक डोस ग्रामीण आरोग्य केंद्रातील २३ लसीकरण केंद्रांवर देण्यात आले. ती संख्या ३,३८४ होती. याशिवाय महापालिकेच्या आठ केंद्रांवर ९८३, तर आठ प्राथमिक आरोग्य केंद्रात ५८४ जणांना लस देण्यात आली. दरम्यान, आतापर्यंत २ लाख ५८ हजार १७६ जणांना पहिला डोस, तर २९ हजार जणांना दुसरा डोस असे एकूण २ लाख ८७ हजार १८३ डोस देण्यात आले आहेत.

--------------

शनिवारी झालेले लसीकरण

केंद्र लस

ग्रामीण रुग्णालय २३ ३३८४

महापालिका ८ ९८३

प्राथमिक आरोग्य केंद्र ८ ५८४

----------------------------------------

एकूण. ३९ ४९५१

Web Title: Five thousand people were also vaccinated in the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.