जामखेड तालुक्यासाठी पाच वर्षांचे व्हिजन ठरवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:37 AM2021-02-18T04:37:46+5:302021-02-18T04:37:46+5:30
जामखेड : जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी एक व्हिजन तयार करण्यात आहे. त्यामुळे शेतकरी समृद्ध बनतील ...
जामखेड : जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी एक व्हिजन तयार करण्यात आहे. त्यामुळे शेतकरी समृद्ध बनतील व सेवा संस्था सशक्त होतील, अशी माहिती जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक अमोल राळेभात यांनी दिली.
जामखेड येथील खासदार डॉ. सुजय विखे यांच्या कार्यालयात राळेभात यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अजय काशिद, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरूण वराट, अशोक निमोणकर, सचिव नितीन सपकाळ, दीपक नेटके, आबासाहेब कोंढाणे, गोरख वराट, गणेश पोकळे, प्रदीप लहाने, कृष्णा पुलावळे आदी उपस्थित होते.
राळेभात म्हणाले, माझे वडील जगन्नाथ राळेभात यांनी १५ वर्षे संचालकपद उपभोगताना शेतकऱ्यांची सेवा केली. कर्ज प्रकरणात कोणालाही अडविले नाही. त्याच धर्तीवर आपण काम करू.
(फोटो १७ जामखेड राळेभात)
जामखेड येथील खासदार डॉ. सुजय विखे यांच्या कार्यालयात जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक अमोल राळेभात यांचा सत्कार करताना प्रा. अरूण वराट, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, शरद कार्ले व इतर.