हंगा नदीला पूर; पिंपळगाव पिसा येथील पूल खाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 12:01 PM2020-10-16T12:01:37+5:302020-10-16T12:02:21+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जलाशयाच्या सांडव्यातून हंगा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीला पूर आला आहे. पिंपळगाव पिसा येथील रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे.
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जलाशयाच्या लाभक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार चालू आहे. जलाशयाच्या सांडव्यातून हंगा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीला पूर आला आहे. पिंपळगाव पिसा येथील रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. हंगा नदीला पूर आल्यामुळे पिंपळगाव पिसा येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे या गावच्या माळवाडी, कदमवाडी, एरंडोली, निंबवी, कोंडेगव्हाण या गावांचा पिंपळगाव पिसा व विसापूरबरोबरचा संपर्क तुटला आहे. या पुलाची उंची अत्यंत कमी जमिनीलगत आहे. विसापूर जलाशय ओव्हरफ्लो झाल्यानंतर नेहमीच हा पूल पाण्याखाली जात असल्याने वरील गावांतील लोकांना नेहमी या पुलाची अडचण येत आहे. |