अतिपावसामुळे फुलांचे भाव भडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 03:56 PM2017-09-28T15:56:11+5:302017-09-28T15:57:04+5:30
अहमदनगर : गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात सर्वत्रच झालेल्या अतिपावसामुळे फुलांचे भाव भडकले आहेत. जास्त पावसामुळे झेंडू, शेवंती, अष्टर आदी फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेवंती १५०, तर झेंडूचा भाव ५० ते ६० रूपये किलोपर्यंत गेला आहे. दस-याच्या दिवशी हे भाव आणखी वाढतील असा अंदाज आहे.

दसरा, दिवाळी या सणांसाठी राज्यात फुलांना मोठी मागणी असते. त्या दृष्टीने यंदा फुलशेती चांगली बहरली होती. सर्वत्रच फुलांचे मळे दिसत असल्याने उत्पादन वाढून भाव कोसळतील, अशी स्थिती होती. परंतु गेल्या पंधरवड्यात अनेक भागांत अतिवृष्टीचा तडाखा बसला. त्यामुळे ऐन तोडायला आलेल्या फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी तर सर्वच फुलशेती पाण्याखाली गेली.
फुलांच्या नुकसानीमुळे मागणीएवढा पुरवठा होण्यात अडचणी येत आहेत, परिणामी फुलांनी भाव खाल्ला आहे. सध्या नगर बाजार समितीत आलेल्या शेवंतीला दीडशे रूपये प्रतिकिलो, तर झेंडूही ५० ते ६० रूपये प्रतिकिलोने विकला जात आहे. दोन दिवसांवर आलेल्या दस-याच्या दिवशी तर हे भाव आणखी भडकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.