सीना नदीला पूर; नगर-कल्याण मार्गावर चार तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:29 AM2019-09-25T11:29:24+5:302019-09-25T11:30:05+5:30
मंगळवारी रात्री सीना पाणलोटात झालेल्या दमदार पावसामुळे सीना नदी दुधडी भरुन वाहून वाहू लागली. नदीवरील कठड्यापर्यत पाणी आल्याने नगर-कल्याण महामार्गावरील वाहतुक चार तास ठप्प झाली होती.
अहमदनगर : मंगळवारी रात्री सीना पाणलोटात झालेल्या दमदार पावसामुळे सीना नदी दुधडी भरुन वाहून वाहू लागली. नदीवरील कठड्यापर्यत पाणी आल्याने नगर-कल्याण महामार्गावरील वाहतुक चार तास ठप्प झाली होती. ही केडगाव भूषणनगर मार्गे वळविण्या आली होती.
नगर शहरासह परिसरात मंगळवारी दिवसभर उष्ण वातावरण होते. मंगळवारी रात्री वाजेनंतर एमआयडीसी, पिंपळगाव, वडगाव गुप्ता, हिंगणगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसाचे सर्व पाणी सीना नदीपात्रात येते. या भागातील बंधारे भरून वाहू लागले. या भागात झालेल्या दमदार पावसामुळे रात्री सीना नदीचे पात्र भरुन वाहू लागले. बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले. सीना नदीच्या पुलावरील कठड्याच्या वरील बाजूने पाणी वाहत होते. पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे या रस्त्यावरून चार तास वाहतूक बंद होती. बुधवारी सकाळी मुलांना शाळा कॉलेज असते. मात्र नदीला पाणी असल्यामुळे मुलांना शाळेला सुट्टी घेण्याची वेळ आली.