कोरोनाप्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या नाक्यावरच्या पोलिसांच्या राहुट्या वादळात गेल्या उडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 01:23 PM2020-06-04T13:23:13+5:302020-06-04T13:23:41+5:30
अहमदनगर- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचे चेकनाके उभारण्यात आले होते. त्यासाठी राहुट्याही तयार करण्यात आल्या होत्या. या राहुट्या बुधवारी झालेल्या वादळाने उडून गेल्या आहेत. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांना पुन्हा एकदा नाके मोकळे झाल्याचे पाहिला मिळाले.

जिल्ह्यात बुधवारी निसर्ग चक्रीवादाळाचा मोठा फटका बसला. या वादळाता सर्वात जास्त फटका संगमनेर तालुक्यातील गावांना बसला.त्याखालोखाल अहमदनगर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांना बसला. संगमनेर, अकोले तालुक्यातील अनेक राहुट्या वादळाने उडाल्या आहेत. वादळामुळे नाक्यांवरील पोलिसांनाही सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला.
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्ह्याच्या सिमेवर अधिक कडक तपासणी केली जाईल, असे कालच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले होते. मात्र वादळाने पोलिसांचे नाकेच उद्धवस्त झाल्याने मोठी चिंता वाढल आहे.