हेमराज फुडस, केटर्सवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 03:47 PM2020-11-04T15:47:43+5:302020-11-04T15:48:17+5:30

अहमदनगर: दिवाळीचे फराळ विक्रीसाठी प्रसिद्ध असलेले नगर शहरातील मे. हेमराज फुड्स, केटर्सचे दुकान व गोदामाची अन्न औषध प्रशासनाने तपासणी करून मुदतबाह्य अन्नपदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. मंगळवारी ( दि 3) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

Food and Drug Administration raid on Hemraj Foods, Caterers | हेमराज फुडस, केटर्सवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा जप्त

हेमराज फुडस, केटर्सवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा जप्त

अहमदनगर: दिवाळीचे फराळ विक्रीसाठी प्रसिद्ध असलेले नगर शहरातील मे. हेमराज फुड्स, केटर्सचे दुकान व गोदामाची अन्न औषध प्रशासनाने तपासणी करून मुदतबाह्य अन्नपदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. मंगळवारी ( दि 3) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

ऐन सणासुदीच्या काळात प्रसिद्ध फराळ विक्रेत्याकडे मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आल्याने ग्राहकांमध्येही खळबळ उडाली आहे.

तपासणीदरम्यान अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हेमराज केटर्सच्या कोठी रस्त्यावरील सथ्या कॉलनी येथील फराळ विक्रीचे दुकान व गोदामातून मुदतबाह्य झालेली मिरची पावडर, व्हिनेगार, रामबंधू चिवडा मसाला, प्रकाश चिवडा मसाला, काळी मिरी मसाला, व्हिनेगार व्हाईट, लेमन स्क्वॅश, समाधान डिस्को पापड, शुभश्री जिरा खाकरा, बदाम थंडाई सिराफ, पायनापल स्क्वॅश आदी अन्नपदार्थांचे दीडशेपेक्षा जास्त पोकेट्स व 74 बॉटल्स जप्त केल्या आहेत. या मुदतबाह्य अन्नपदार्थांपासून हेमराज केटर्स येथे दिवाळीचे फराळ व मिठाई तयार होत असल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांना आढळून आले. तसेच अन्नपदार्थ तयार करत असताना नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले.

तपासणी दरम्यान हेमराज केटर्सचा संचालक विश्वजीत बोरा याने अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना दमदाटी करून कारवाईत अडथळा निर्माण केला. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सं. पां. शिंदे यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

अन्न परवाना नसतानाही विक्री

 

दिवाळी निमित्त हेमराज केटर्सच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात फराळाची विक्री केली जाते. ही दुकान चालविणार्‍या विश्वजीत बोरा याने प्रशासनाची दिशाभूल करून अन्न परवाना न घेता अतिशय किरकोळ विक्री करण्यासाठी असलेला नोंदणी दाखला घेतल्याचे या कारवाईत समोर आले. अन्न प्रशासनाने हा नोंदणी दाखला रद्द केला आहे.

 

बोरा अधिकाऱ्यांवर धावून गेला

 

अन्नपदार्थ तपासणी दरम्यान विश्वजीत हेमराज बोरा व त्याचा लहान बंधू यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करून त्यांच्या अंगावर धावून गेले. गोदामातील मालाची फेकाफेक करून आरडाओरड केली. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विश्वजीत हेमराज बोरा व त्याचा लहान भाऊ यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Food and Drug Administration raid on Hemraj Foods, Caterers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.