माजी सरपंचाकडून रोजगारबाधित ७० कुटुंबांना फूड पॅकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:21 AM2021-05-09T04:21:58+5:302021-05-09T04:21:58+5:30
सुपा: पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजू शेख यांनी गावातील रोजगारबाधितांची उपासमार टाळण्यासाठी जवळपास ७० कुटुंबांना महिनाभर पुरेल ...
सुपा: पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजू शेख यांनी गावातील रोजगारबाधितांची उपासमार टाळण्यासाठी जवळपास ७० कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढे धान्य, किराणा व जीवनावश्यक वस्तूंच्या फूड पॅकेटचे वाटप केले.
भाळवणी येथे आमदार नीलेश लंके यांनी सुरू केलेल्या शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरातील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी १ लाख रुपयांचा मदतनिधी आमदार लंके यांच्याकडे सुपूर्द केला. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातही गतवर्षी राजू शेख यांनी असेच गावातील गरजू व गोरगरीब ग्रामस्थांसाठी फूड पॅकेटचे वाटप केले होते. नंतरच्या काळात इतरांनी त्यापासून प्रेरणा घेत फूड पॅकेट, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू वाटल्याने समाजातील गरीब, मजूर, कामगार, हातावर पोट भरणारे ग्रामस्थ यांची चूल पेटली.
---
सुप्यातही शिवथाळी सुरू करा..
सुप्यात तयार होणाऱ्या शिवथाळीचे पारनेरमध्ये वितरण होते. सुप्यातील १५० ते २०० गरजू कुटुंबांना शिवथाळीचा लाभ मिळायला हवा. आपत्ती काळातील उपासमारीच्या संकटातून त्यांची मुक्तता होऊ शकते. या योजनेचे संचालक सुभाष लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता तहसीलदार यांनी मंजुरी दिल्यास त्याची अंमलबजावणी करून सुपेकरांना कोरोना काळात जगण्याचे बळ देणारी ही शिवथाळी देता येईल, असे त्यांनी सांगितले.