अन्न सुरक्षा अधिकारी लाचेच्या जाळ््यात
By Admin | Published: May 21, 2014 12:22 AM2014-05-21T00:22:54+5:302024-10-21T17:26:24+5:30
अहमदनगर : रासायनिक द्रव्ये वापरून पिकविलेल्या आंब्यावर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणार्या अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे याला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पकडले.
अहमदनगर : रासायनिक द्रव्ये वापरून पिकविलेल्या आंब्यावर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणार्या अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे याला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पकडले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे यांनी आंबा विक्रीच्या दुकानात जाऊन दुकानातील आंब्याचा नमुना घेऊन तपासणी केली. आंब्याचा नमुना तपासणीला न पाठविण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी नगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी कार्यालयात सापळा लावला. दहा हजार रुपयांची लाचेची रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारत असताना मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला आणि कावळे याला पकडले. कावळे यांनी ही रक्कम पंच साक्षीदारांसमवेत स्वीकारली. ही कारवाई नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. नगर- मनमाड रोडवरील आॅक्झिलिअम शाळेजवळ असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयातच ही रक्कम स्वीकारल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक अशोक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)