अत्याचार करून बळजबरीने लग्न लावले; दत्तनगरच्या सहा जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 06:30 PM2018-02-14T18:30:10+5:302018-02-14T18:30:25+5:30

दत्तनगर येथील तरूणीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच मालेगाव येथे नेऊन तिचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. याप्रकरणी सहा जणांविरूद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Forcibly married with atrocities; Six of Dattanagar police have filed criminal cases | अत्याचार करून बळजबरीने लग्न लावले; दत्तनगरच्या सहा जणांवर गुन्हे दाखल

अत्याचार करून बळजबरीने लग्न लावले; दत्तनगरच्या सहा जणांवर गुन्हे दाखल

श्रीरामपूर : दत्तनगर येथील तरूणीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच मालेगाव येथे नेऊन तिचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. याप्रकरणी सहा जणांविरूद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पीडित मुलगी अठरा वर्षे वयाची असून गरीब कुटुंबातील आहे. तिने दिलेल्या फिर्यादीवरून सकलेन उस्मान बागवान, त्याची आई शहनाज बागवान, उस्मान इस्माईल बागवान, शब्बू लियाकत बागवान, शाबीर उस्मान बागवान, शहाबुद्दीन सिकंदर बागवान (रा. सर्व दत्तनगर) या आरोपींविरोधात बलात्कार, तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तनगर येथील सिकंदर उस्मान बागवान यांच्या भंगार दुकानात पीडित मुलगी मे २०१७ पासून काम करीत होती. तेथेच सकलेन बागवान याच्याशी तिची ओळख झाली. सकलेन याने लनाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. वापी (गुजरात) येथे त्याच्या आईकडे नेत तिचा बळजबरीने गर्भपात करण्यात आला. तिने विरोध केला असता तिला आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपी सकलेन याची आई शाहनाज, वडील उस्मान बागवान यांनी मालेगाव येथे नेत मौलवींसमक्ष सकलेन बरोबर विवाह लावला. त्यावेळी सिकंदर, लियाकत व इतर तीन ते चार जण उपस्थित होते. मालेगाव येथून पुन्हा वापी येथे नेत दुसºयांदा गर्भपात केला, अशी कैफियत पीडितेने पोलिसांकडे मांडली आहे. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Forcibly married with atrocities; Six of Dattanagar police have filed criminal cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.