कृषी केंद्रांकडून युरियासाठी इतर खते, औषधांची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 03:36 PM2020-07-22T15:36:45+5:302020-07-22T15:37:33+5:30

पिकांना खते मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कृषी सेवा केंद्रांसमोर तासन्तास रांगा लावूनही युरिया खताची एक अथवा दोन गोण्या मिळत आहेत. मात्र, युरियासोबत इतर खते किंवा औषधे घेण्याची सक्ती केली जात आहे.

Forcing other fertilizers, medicines for urea from agricultural centers | कृषी केंद्रांकडून युरियासाठी इतर खते, औषधांची सक्ती

कृषी केंद्रांकडून युरियासाठी इतर खते, औषधांची सक्ती

मधु ओझा । 

पुणतांबा : राहाता तालुक्यातील पुणतांबा परिसरात यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाले. शेतक-यांनी उत्साहात पेरणी केली. मात्र पिकांना खते मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कृषी सेवा केंद्रांसमोर तासन्तास रांगा लावूनही युरिया खताची एक अथवा दोन गोण्या मिळत आहेत. मात्र, युरियासोबत इतर खते किंवा औषधे घेण्याची सक्ती केली जात आहे.

युरियाचा तुटवडा भासणार नसल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी ग्रामीण भागात युरिया सहजासहजी मिळत नाही. कृषी सेवा केंद्रात फक्त १२० ते १५० युरियाच्या गोण्या येत आहेत. पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने वाटप कसे करावे, याचा प्रश्न केंद्रचालकांना पडला आहे. खतांबरोबर इतरही माल दुकानदारांना घ्यावा लागत आहे. युरिया खरेदी करणारा शेतकरी इतर माल घेण्याचे नाकारत आहे. त्यामुळे शेतकरी-कृषी सेवा केंद्र चालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत.

युरियाच्या पुरवठ्याकडे अहमदनगर जिल्हा पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे. पुणतांबा येथील कृषी सेवा केंद्राच्या शिल्लक मालाची तपासणी आणि चौकशी वरिष्ठ अधिका-यांकडून होणे गरजेचे आहे.     
    
- नामदेवराव धनवटे, संचालक, पुण्यस्तंभ शेतकरी गट.

युरियाचा साठा कमी येत असल्याने मालाचा तुडवडा जाणवत आहे. पुरवठा कमी व मागणी वाढल्याने प्रत्येक आधारवर एक गोणी खताचे नियोजन केले आहे.

 -किरण धुमाळ, कृषी अधिकारी, पुणतांबा.

दरवर्षी राज्यातील युरियाची किती मागणी असते हे सरकारला माहिती असते. शेतक-यांची मागणी आगाऊ नोंदवून गावपातळीवर पुरवठा करावा. 

-विनोद धनवटे, सचिव, पाणलोट समिती पुणतांबा.     

Web Title: Forcing other fertilizers, medicines for urea from agricultural centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.