ठगांनी पोलिसांना दाखविला फॉरेनच्या सिगारेटचा धूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 05:03 PM2018-09-26T17:03:16+5:302018-09-26T17:06:10+5:30

अन्न व भेसळ प्रतिबंधक संस्थेचे अधिकारी असल्याचे सांगत राज्यातील व्यापा-यांना पोलीस बंदोबस्तात गंडा घालणा-या दोघांना श्रीगोंद्यातील व्यापा-यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.

Foreign cigarette smoke shown to police by thugs | ठगांनी पोलिसांना दाखविला फॉरेनच्या सिगारेटचा धूर

ठगांनी पोलिसांना दाखविला फॉरेनच्या सिगारेटचा धूर

श्रीगोंदा : अन्न व भेसळ प्रतिबंधक संस्थेचे अधिकारी असल्याचे सांगत राज्यातील व्यापा-यांना पोलीस बंदोबस्तात गंडा घालणा-या दोघांना श्रीगोंद्यातील व्यापा-यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. कुंदनसिंह काहाटे (अजिंठा सोसायटी, औरंगाबाद), अभय बाफना (रा. बीड रोड, जामखेड) या तोतया अधिका-यांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली.
सविस्तर माहिती अशी, कर्जत येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील पोलिसांना श्रीगोंदा शहरात एक व्यापारी फॉरेनच्या सिगारेट विकत आहे. हा व्यापारी तुम्हाला पकडून देतो, असे सांगत पोलिसांना बरोबर घेतले. बहुरूपीप्रमाणे हे तोतया अधिकारी पोलीस बंदोबस्तात श्रीगोंदा शहरातील एका कलरच्या दुकानात घुसले. तुम्ही ओरिजिनल कंपनीच्या नावाखाली बनावट माल घेऊन ग्राहकांची फसवणूक केली आहे. तुम्हाला अटक करावी लागेल, असा दम त्यांनी व्यापा-यांना दिला. व्यापा-याला संशय आल्याने त्याने प्रशांत दरेकर, हरिदास शिर्के, अशोक खेंडके, समीर बोरा, नानासाहेब कोंथिबीरे यांना बोलावून घेतले. त्यावेळी हे महाभाग चांगलेच गडबडले. या कार्यकर्त्यांनी दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
तोतया अधिकारी आमच्या पोलिसांकडे आले. तुम्हाला फॉरेनची सिगारेट विकणारा व्यापारी पकडून देतो म्हणूव पोलिसांना नेले. कलरच्या दुकानात गेल्यानंतर तोतया असल्याचा हा प्रकार लक्षात आला. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी सांगितले.
कॅमे-यात बंदिस्त
तोतया अधिकारी व त्यांच्याबरोबर चार पोलिसांना नागरिकांना मोबाईल कॅमे-यात बंदिस्त केले आहे. तोतया अधिका-यांनी पोलीस बंदोबस्तात श्रीगोंदा शहरातील पाच सहा व्यापा-यांना लुटले आहे. तोतया कोण आणि पोलिस कोण याची चौकशी करण्याची मागणी व्यापा-यांनी केली.

 

 

Web Title: Foreign cigarette smoke shown to police by thugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.