कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:20 AM2021-04-04T04:20:45+5:302021-04-04T04:20:45+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ज्यांना लक्षणे आहेत, असे नागरिक स्वत:हून चाचण्या करण्यासाठी जात आहेत. मात्र, ...
अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ज्यांना लक्षणे आहेत, असे नागरिक स्वत:हून चाचण्या करण्यासाठी जात आहेत. मात्र, जे पॉझिटिव्ह येत आहेत, हे अजूनही घरातच विलगीकरणात राहत आहेत. त्यांच्या संपर्कातील आलेल्यांकडून चाचण्या केल्या जात नाहीत आणि पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात कोण कोण आले, याची विचाराणाही सध्या होत नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा प्रशासनाला विसर पडला की काय, असेच चित्र दिसते आहे.
सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत १,२०० ते १,५०० रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. शनिवारी तब्बल १,९९६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कातील किमान दहा हजार जणांची चाचणी होणे आवश्यक आहे. मोफत चाचणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालय, ग्रामीण व शहरी भागातील सरकारी रुग्णालयात गर्दी होत आहे. निम्मे लोक चाचणीविना परत जात आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. काही पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क केला असला त्यांनी आमच्या संपर्कात आलेल्या घरातल्या सोडून इतर संपर्कात आलेल्या एकाचीही तपासणी झालेली नाही.
------------------
दररोज सरासरी १,५०० पॉझिटिव्ह, चाचण्या मात्र चार हजार
दररोज सरासरी १,२०० ते १,३०० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. एक पॉझिटिव्ह आलेल्यांच्या संपर्कातील किमान २० जणांच्या चाचण्या कराव्यात, असे प्रशासनाने आदेश दिले आहेत. मात्र, केवळ रोज सरासरी चार ते पाच हजार जणांच्या चाचण्या होत आहेत. गेल्या दोन दिवसांत चाचण्यांची संख्या वाढली, तरी ती संख्या ७ हजारांपर्यंतच गेली आहे.
-----------------
हा घ्या पुरावा
१) बालिकाश्रम रोडवरील एक तरुण लग्नाला गेला होता. तेथून परत आल्यावर त्याला ताप, सर्दी, खोकला असा त्रास झाला. त्याने चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्याने त्याच्या पत्नीची चाचणी केली व तीही पॉझिटिव्ह आली. ते आता घरीच क्वारंटाइन आहेत. मात्र, त्यांनी कोणालाही आपण बाधित असल्याचे सांगितले नाही, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी, असेही त्यांनी मित्र-नातेवाइकांना सांगितले नाही, तसेच रुग्णालय प्रशासनानेही संपर्कातील व्यक्तींची यादी, नाव, फोन नंबर असे काही मागितले नाही, असे पॉझिटिव्ह रुग्णाने सांगितले.
२) पाइपलाइन रोडवरील एका व्यापाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. घरातील इतर पाच जणांचाही चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ते सर्व बंगल्यात राहत आहेत. फोनवरून त्यांनी औषधे घेतली. मात्र, अहवाल येईपर्यंत ते खुलेआम फिरत होते. दुकानामुळे त्यांचा इतरांशी संपर्क आलेला होता. किमान व्यापारी म्हणून आमच्याकडून प्रशासनाकडून यादी घ्यायला हवी होती, असे त्या रुग्णाने सांगितले. सदर बंगल्याच्या बाहेर गृहविलगीकरणाचा पोस्टरही लावले नाही.
३) माझ्या कॉलनीत एकाचे अख्खे कुटुंब पॉझिटिव्ह आले. त्यामुळे महापालिकेने त्यांच्या घरावर गृहविलगीकरणाचा फलक लावला. मात्र, तो फलक बंगल्याच्या मालकांनी फाडला. घरात लोक मास्क लावून फिरत आहेत. त्यांच्या संपर्कातील कोणत्याही व्यक्तीची तपासणी झालेली नाही.
--------------
डमी- नेट फोटो
३१ कॉन्टक्ट ट्रेसिंग
डेथ
कोरोना-२(४)
क्वारंटाइन (३)
ट्रिटमेंट २(३)
ट्रेसिंग
----------------