मतभेद विसरून गावच्या विकासासाठी एकत्र या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:21 AM2021-02-11T04:21:39+5:302021-02-11T04:21:39+5:30
यशोधन संपर्क कार्यालयात बुधवारी ( दि.१०) नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे ...
यशोधन संपर्क कार्यालयात बुधवारी ( दि.१०) नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे मुंबई विभगाचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक इंद्रजित थोरात, जिल्हा परिषद सदस्य आर.एम.कातोरे, अजय फटांगरे यांसह चंद्रकांत कडलग, सोमनाथ गुंजाळ, मधुकर गुंजाळ, अर्चना बालोडे, विष्णुपंत रहाटळ, राजेंद्र चकोर, गौरव डोंगरे, विलास नवले, मोहन गुंजाळ उपस्थित होते.
थोरात म्हणाले, संगमनेर तालुका हा एक परिवार आहे. या तालुक्याने राजकारणाची आदर्श संस्कृती निर्माण केली आहे. संगमनेरची ही वैभवशाली परंपरा इतरांनाही दिशादर्शक ठरली. भारतामध्ये लोकशाहीप्रणाली असून लोकशाहीमध्ये निवडणुका अनिवार्य आहेत. ग्रामपंचायती, लोकसभा यामध्ये वेगवेगळ्या निवडणुका सातत्याने होत असतात. परंतु निवडणुकांमध्ये मनभेद कधीही होऊ देऊ नका. संगमनेर तालुक्यात तर आपण वेगळी संस्कृती निर्माण केली आहे. गावचे नेतृत्व करताना सर्वांना सोबत घ्या. शासकीय योजना प्रभावीपणे राबवताना जनमाणसांपर्यंत पोहचविण्याचे काम करा. शासकीय योजनांच्या पाठपुराव्यासाठी आपण कायम प्रत्येकाच्या पाठीशी उभे आहोत, असेही ते म्हणाले.