वीजबिल त्वरित माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:18 AM2021-01-18T04:18:35+5:302021-01-18T04:18:35+5:30

पक्षाचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, शहराध्यक्ष किशोर वाडीले, अय कुमावत, यशंत जेठे, प्रवीण ...

Forgive the electricity bill immediately | वीजबिल त्वरित माफ करा

वीजबिल त्वरित माफ करा

पक्षाचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, शहराध्यक्ष किशोर वाडीले, अय कुमावत, यशंत जेठे, प्रवीण जमदाडे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी महावितरणच्या मुख्य रस्त्यावरील कार्यालयात शिनवारी हे आंदोलन केले. अंगावरील कपडे उतरवून हातात फलक घेत सरकारविरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे कार्यालय दणाणून गेले होते.

कोरोनामुळे आजही देशाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. उद्योग-व्यवसायात कामगारांची मोठ्या प्रमाणात कपात झाली. कमी वेतनात काम करण्याचा फतवा काढण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत वीज बिलाची सक्तीने वसुली केली जात आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. यात भैरव मोरे, भरत डेंगळे, अक्षय पवार, सागर देवकर,अभिजित राऊत, दीपक परदेशी आदी सहभागी झाले होते.

----------

फोटो ओळी : १७आप आंदोलन

महावितरण कार्यालयात कपडे उतरवून अनोखे आंदोलन करताना आपचे कार्यकर्ते.

------

Web Title: Forgive the electricity bill immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.