माजी महापौर अभिषेक कळमकर यांना धक्क्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 03:22 PM2019-09-21T15:22:05+5:302019-09-21T15:23:05+5:30
राष्टवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत नगर येथे शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर कार्यक्रमस्थळावरुन बाहेर पडताना राष्टवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांना काही कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला.
अहमदनगर : राष्टवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत नगर येथे शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर कार्यक्रमस्थळावरुन बाहेर पडताना राष्टवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांना काही कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला.
राष्टवादी काँग्रेसचा मेळावा संपल्यानंतर कळमकर हे कार्यालयातून बाहेर पडत होते. त्यांच्यासमवेत किरण काळे हे देखील होते. यावेळी बाहेर असलेल्या राष्टवादीच्या काही कार्यकर्त्यांनी कळमकर यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. आमदार संग्राम जगताप यांच्यासमोरच हा प्रकार घडला. या प्रकारामुळे येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जगताप समर्थकांनीच हा प्रकार केल्याचा आरोप कळमकर यांनी केल्याची माहिती समजली आहे. दरम्यान, या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी कळमकर हे कोतवाली पोलीस ठाण्यात गेले आहेत. या घटनेमुळे नगर शहरातील राष्टवादी काँग्रेसमध्ये कळमकर-जगताप गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कळमकर हे राष्टवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे आहेत. कळमकर हे राष्टवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.