‘ते’ माजीमंत्री म्हणतात.. राज्यात केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:27 PM2020-09-25T12:27:02+5:302020-09-25T12:27:50+5:30
केंद्र सरकार विविध माध्यमातून शेतकरी, जनतेला सहकार्य करीत आहे. पण राज्य सरकारला सत्तेशिवाय कशाचेही देणे घेणे नाही. सध्याचे राज्य सरकार केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार आहे, अशी टीेका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी नगरमध्ये केली.
अहमदनगर : केंद्र सरकार विविध माध्यमातून शेतकरी, जनतेला सहकार्य करीत आहे. पण राज्य सरकारला सत्तेशिवाय कशाचेही देणे घेणे नाही. सध्याचे राज्य सरकार केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार आहे, अशी टीेका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी नगरमध्ये केली.
नगर शहरात शुक्रवारी (दि.२५ सप्टेंबर) पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना प्रा. शिंदे बोलत होते. सहा महिन्याच्या आत अधिवेशन घ्यायचे असते. त्यानुसार राज्य सरकारने दोन दिवस अधिवेशन घेतले. मात्र त्या अधिवेशनात एक पत्रकार आणि एका सेलीब्रेटीवर सरकारने प्रस्ताव आणला. यावरुन या सरकारला जनतेचे काहीदेणे नाही हे दिसून येते. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला तरी अजून कोरोना रुग्णांना सुविधा देण्यास सरकार अपयशी ठरले आहे, असेही प्रा. शिंदे म्हणाले.
काँग्रेस-राष्टÑवादीला चांगलं कळतं की आपण कुठेच नव्हतो. मात्र आता आपण सरकारमध्ये आहोत. त्यामुळे केवळ सरकार पडू द्यायचे नाही. सरकार चालवायचे आणि सरकारमध्ये रहायचे, असेच त्यांचे काम चालू आहे. अतिवृष्टी, विकास, रस्ते, पिकांचे पंचनामे या प्रश्नावर सरकार बोलण्यास तयार नाही. सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरले आहे. हे विदारक चित्रच सरकारला भविष्यात खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असेही टीका शिंदे यांनी केली.