नगर महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्यात आमदारांनी ठेकेदाराला पाठीशी घातले- माजी आमदार राठोड यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 04:02 PM2018-01-04T16:02:26+5:302018-01-04T16:03:29+5:30

अहमदनगर महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्यात आमदारांनी ठेकेदाराला पाठिशी घातले, असा आरोप माजी आमदार अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला.

Former MLA Rathod accused the MLAs of supporting the contractor in street scam in city corporation | नगर महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्यात आमदारांनी ठेकेदाराला पाठीशी घातले- माजी आमदार राठोड यांचा आरोप

नगर महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्यात आमदारांनी ठेकेदाराला पाठीशी घातले- माजी आमदार राठोड यांचा आरोप

अहमदनगर : महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्यात आमदारांनी ठेकेदाराला पाठिशी घातले, असा आरोप माजी आमदार अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला.
राठोड म्हणाले, ४० लाख रुपये ही जनतेच्या पैशांची लूट आहे. हा भ्रष्टाचार ४ ते ५ कोटीपर्यंत जावू शकतो. शहरातील हायमॅक्स हे भ्रष्टाचाराचे हायमॅक्स आहेत. हायमॅक्स खाली धड वाचताही येत नाही, असे निकृष्ट काम झाले आहे. जनतेच्या पैशांची लूट करणा-या ठेकेदाराला लोकप्रतिनिधी पाठीशी घालत आहेत. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र घोटाळयाची चौकशी इथेच व्हावी. राज्य सरकारकडून चौकशी करायची असेल तर गत पाच वर्षातील पथदिव्यांच्या कामांची चौकशी व्हावी. घोटाळा झालेल्या पथदिव्यांच्या कामांची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक संपत बारस्कर यांचीच आहे. ठेकेदार सचिन लोटके हा आठ दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनात आमदारांसोबत होता, असे राठोड म्हणाले.

Web Title: Former MLA Rathod accused the MLAs of supporting the contractor in street scam in city corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.