माजी खासदार दिलीप गांधी म्हणाले, पंकजा मुंडे यांचेच नेतृत्त्व प्रभावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 03:46 PM2020-10-26T15:46:16+5:302020-10-26T17:11:52+5:30
अहमदनगर : सर्वसामान्यांचे नेतृत्वाचा स्व.गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे या चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत. पक्षाने राष्ट्रीय महामंत्रीसारखे मोठ्या जबाबदारीचे पद देऊन त्यांची कार्याची दखल घेतली आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम अधिक प्रभावी होईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी केले.
सर्वसामान्यांचे नेतृत्वाचा स्व.गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे या चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत. पक्षाने राष्ट्रीय महामंत्रीसारखे मोठ्या जबाबदारीचे पद देऊन त्यांची कार्याची दखल घेतली आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम अधिक प्रभावी होईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी केले.
भाजपाच्या नूतन राष्ट्रीय महामंत्री पंकजा मुंडे या गोपीनाथगड येथील दसरा मेळावा करुन पुण्याकडे जात असतांना माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी थांबल्या होत्या. यावेळी दिलीप गांधी, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी पंकजा मुंडे यांचे स्वागत केले. यावेळी गांधी म्हणाले, सर्वसामान्यांच्या नेतृत्वाचा स्व. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे या चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत. पक्षाने राष्ट्रीय महामंत्रीसारखे मोठ्या जबाबदारीचे पद देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम अधिक प्रभावी होईल.
-------------
राज्य सरकारचे मदत अपुरीच- पंकजा मुंडे
पंकजा मुंडे म्हणाल्या, बऱ्याच दिवसांनी नगरला थांबण्याचा योग आला. दिलीप गांधी कुटूंबियांशी मुंडे कुटूंबियांचे घनिष्ठ संबंध आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. शेतकरीही अतिवृष्टीमुळे संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने जास्तीत जास्त मदत संकटकाळात जनतेला करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेजचे स्वागत करते. मात्र याहून अधिक मोठे पॅकेज देणे अपेक्षित होते. केंद्र सरकारही मोठी मदत सर्व जनतेला या संकटकाळात करत आहे.