नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणी माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांना अटक 

By अण्णा नवथर | Published: January 29, 2024 10:47 AM2024-01-29T10:47:05+5:302024-01-29T10:47:25+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

Former president Ashok Kataria arrested in case of ahmadnagar urban corruption | नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणी माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांना अटक 

नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणी माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांना अटक 

अहमदनगर: नगर अर्बन गैर व्यवहार प्रकरणी माजी अध्यक्ष  अशोक माधवलाल कटारीया (वय ७२, रा. टाकळी ढोकेशवर )
 यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी पहाटेच्या दरम्यान अटक केली.

नगर अर्पण गैरव्यवहार प्रकरणी माजी संचालक मनेष साठे व अनिल कोठारी यांना दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या गैरव्यवहार प्रकरणी बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानंतर आता पोलिसांनी माजी संचालकाडे मोर्चा वळविला आहे. फॉरेन्सिक ऑडिट नुसार हा एकूण २९२ कोटींचा घोटाळा असून , यामध्ये शंभरहून अधिक आरोपी आहेत. यातील बँकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली होती.

तत्कालीन अध्यक्ष व संचालक संचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे माजी संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. यातील काही आरोपी फरार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने मुंबईतील संस्थेकडून फॉरेन्सिक ऑडिट करून घेण्यात आले. त्यानंतर घोटाळ्यात कोणाचा कसा सहभाग आहे, हेही स्पष्ट झालेले आहे. त्याआधारे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून, इतरही आरोपींना पोलिसांकडून लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Former president Ashok Kataria arrested in case of ahmadnagar urban corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.