बालमावळ््यांनी बनविले किल्ले!
By Admin | Published: October 27, 2016 12:25 AM2016-10-27T00:25:22+5:302016-10-27T00:47:54+5:30
अहमदनगर : लोकमत बाल विकास मंच व साईदिप ग्रुप आयोजित किल्ले बनवा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. हॉटेल यश पॅलेस व यश ग्रँड हे या स्पर्धेचे सहप्रायोजक होते.
अहमदनगर : लोकमत बाल विकास मंच व साईदिप ग्रुप आयोजित किल्ले बनवा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. हॉटेल यश पॅलेस व यश ग्रँड हे या स्पर्धेचे सहप्रायोजक होते.
शहरातील भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी सकाळी ही स्पर्धा झाली. स्पर्धेत एकूण ८० पेक्षा जास्त संघ सहभागी झाले होते.
प्रत्येक संघात ६ पेक्षा जास्त विद्यार्थी होते. दिवाळीचा जल्लोष आणि किल्ले बनवा स्पर्धेमुळे सहभागी विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित झाला होता. विद्यार्थ्यांना किल्ले बनविण्यासाठी माती, विटा, पाणी आयोजकांच्या वतीने देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी डोंगराचा माथा, त्यावर किल्ला, मावळे, खोल-खोल दऱ्या, झाडे, प्राणी, पक्षी किल्ल्याच्या आसपासच्या प्रदेश तेथील वस्ती, शेती, तलाव इ. गोष्टी हुबेहूब साकारून आपआपले किल्ले बनविले. आपलाच किल्ला कसा आकर्षक दिसेल त्यासाठी धावपळ, एकमेकांना सूचना अशा उत्साही वातावरणात ही स्पर्धा झाली.
स्पर्धेचे परीक्षण भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयाचे सतीश गुगळे, प्रियदर्शनी पब्लिक स्कूलचे नितीन कांगोरे यांनी केले. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापक दुगड सर व उपमुख्याध्यापक औटी सर तसेच हॉटेल यश पॅलेस व यश ग्रँडचे योगीराज गाडे यांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख बक्षिसे, आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आली. तसेच प्रत्येक सहभागी संघांना देखील प्रमाणपत्रे देण्यात आली. उपस्थित पालकांनी देखील लोकमतच्या या उपक्रमाची स्तुती केली.
(प्रतिनिधी)