वीज पडून चाळीस मेंढ्या ठार, नगर तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 02:52 PM2020-06-13T14:52:22+5:302020-06-13T14:52:58+5:30
निंबळक (जि. अहमदनगर) : खातगाव ( ता. नगर ) येथे वीज पडून संतोष पवार यांच्या चाळीस मेंढया जागीच ठार झाल्या. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजता निमगाव घाणा रोडला घडली.
निंबळक (जि. अहमदनगर) : खातगाव ( ता. नगर ) येथे वीज पडून संतोष पवार यांच्या चाळीस मेंढया जागीच ठार झाल्या. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजता निमगाव घाणा रोडला घडली.
संतोष पवार नेहमीप्रमाणे निमगाव घाणा रस्त्यावर मेंढया चारण्यासाठी गेले होते. या परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण पसरले होते. दुपारी दोनच्या सुमारास काळे कुटट ढग दाटून आले होते. तेवढयाच वेळात जोरात विजेचा कडकडाट झाला. या कडकडीत पवार यांच्या शेळया व मेंढ्याच्या अंगावर जोरावर वीज पडली. यामध्ये ४० मेंढया जागीच ठार झाल्या. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली.
जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. त्यात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह व मेघगर्जनेसह पाऊस होईल,असा हवामान खात्याचा अंदाज आहे.