चाळीस वर्षीय महिलेस तातडीच्या उपचारातून मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:50 AM2021-01-13T04:50:20+5:302021-01-13T04:50:20+5:30
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये एका ४० वर्षीय महिलेला तातडीचे उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले आहे. ...
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये एका ४० वर्षीय महिलेला तातडीचे उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले आहे. या महिलेवर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. अनिल माने यांनी उपचार केले आहेत.
रविवारी एका ४० वर्षीय महिलेस अचानक त्रास होऊ लागल्याने बेशुद्ध अवस्थेत आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना अति उच्च रक्तदाब होता. शरीर मोठ्या प्रमाणात फुगलेले होते. या महिलेने इतरत्र प्राथमिक उपचारही घेतले होते. परंतु, प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यावर त्यांना आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर डॉ. अनिल माने यांनी तातडीने उपचार केले. जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर या महिलेवर विविध उपचार करून या महिलेच्या पोटातून सुमारे ६ लीटर पाणी काढण्यात आले. त्यानंतर काही वेळातच या महिलेची प्रकृती स्थिर झाली होती.
विशेष म्हणजे डॉ. माने यांनी काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय संचालक म्हणून या रुग्णालयाचा पदभार स्वीकारला आहे. डॉ. माने यांनी अमेरिकेसह विविध १५ देशात उत्तम सेवा दिली आहे. अशी माहिती हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित फरताळे यांनी दिली आहे. महिलेवर तातडीने उपचार करून जीवदान दिल्याने कुटुंबीयांकडून डॉ. माने यांचे आभार व्यक्त केले आहे. (वा.प्र.)