कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप अनंतात विलिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:54 AM2017-10-16T11:54:09+5:302017-10-16T14:53:56+5:30
कुंडलिकराव जगताप यांचा मृतदेह सोमवारी सकाळी ७.३० वाजता कोईमतूर येथू पिंपळगाव पिसा येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. तेथे त्यांचे कुटूंबीय व कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतले़ त्यानंतर तेथून अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातून ही अंत्ययात्रा कुकडी कारखान्यावर आली.
अहमदनगर : श्रीगोंदा येथील कुकडी कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ नेते कुंडलिकराव जगताप उर्फ तात्या (वय ७०) यांच्यावर कुकडी कारखाना कार्यस्थळावर सोमवारी सकाळी ११़ ४५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुंडलिकराव जगताप यांचे रविवारी सकाळी १०.३० वाजता कोईमतूर येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस) यांचे ते वडील होत. गेल्या काही दिवसांपासून कोईमतूर येथे जगताप यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. कुंडलिकराव जगताप यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य, श्रीगोदा पंचायत समितीचे माजी सदस्य व जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले़ त्यांच्या अंत्यसंस्कारास खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, आमदार संग्राम जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते, संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, म्हाडाचे व्यवस्थापक तथा दिवंगत कुंडलिकराव जगताप यांचे व्याही राजेंद्र चव्हाण आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कुंडलिकराव जगताप यांचा मृतदेह सोमवारी सकाळी ७.३० वाजता कोईमतूर येथू पिंपळगाव पिसा येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. तेथे त्यांचे कुटूंबीय व कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतले़ त्यानंतर तेथून अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातून ही अंत्ययात्रा कुकडी कारखान्यावर आली. तेथे कार्यकर्त्यांनी व कामगारांनी अंत्यदर्शन घेतले़ आमदार राहुल जगताप यांनी मुखाग्नी दिला.
शरद पवार येणार
राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार हे मयत कुंडलिकराव जगताप यांच्या अंत्यसंस्कारास पोहोचू शकले नाहीत. ते दुपारी तीन वाजता येणार आहेत.