अहमदनगरच्या चौघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:14 AM2021-02-22T04:14:36+5:302021-02-22T04:14:36+5:30
वारणानगर येथे झालेल्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत वरिष्ठ गटामध्ये अशोक भाऊसाहेब मचे व कुंडलिक नामदेव आठवे याने प्रथम तर राजरत्न ...
वारणानगर येथे झालेल्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत वरिष्ठ गटामध्ये अशोक भाऊसाहेब मचे व कुंडलिक नामदेव आठवे याने प्रथम तर राजरत्न सुधाकर गाडे याने तृतीय क्रमांक पटकावला. मुलींमध्ये १९ वर्षांखालील गटात सृष्टी सुधाकर गाडे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. या चौघांची अमृतसर येथे २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय फिल्ड आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
७ फेब्रुवारी रोजी वारणानगर येथील वाय. सी. कॉलेजच्या स्टेडियममध्ये राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत राज्यातील २५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये नगरच्या अशोक मचे याने वरिष्ठ गटातील इंडियन राऊंड या प्रकारात दोन सुवर्ण पदके जिंकून प्रथम क्रमांक पटकाविला तसेच कुंडलिक आठवे याने इंडियन बेअर बो प्रकारात दोन सुवर्णपदके मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. राजरत्न गाडे याने कांस्यपदक मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. मुलींमध्ये १९ वर्षांखालील गटात इंडियन राऊंड या प्रकारात रौप्यपदक मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. वरील सर्व खेळाडूंना संघटनेचे सचिव व प्रशिक्षक सतीश गायकवाड व स्वाती गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.