पोलिसांवर हल्ला करणाऱ्या चौघांना संगमनेरातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 08:18 PM2021-05-08T20:18:46+5:302021-05-08T20:19:35+5:30
गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला करत दगडफेक केल्याची घटना संगमनेर शहरातील दिल्ली नाका (तीन बत्ती) परिसरात गुरुवारी (दि. ६) संध्याकाळच्या सुमारास घडली होती.
संगमनेर : गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला करत दगडफेक केल्याची घटना संगमनेर शहरातील दिल्ली नाका (तीन बत्ती) परिसरात गुरुवारी (दि. ६) संध्याकाळच्या सुमारास घडली होती. हल्ला करणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी (दि. ७) रात्री उशिरा ताब्यात घेत अटक केली.
मुसेब अलाउद्दीन शेख (वय ३१, रा. अपनानगर, संगमनेर), आसिफ मेहमूद पठाण (वय ३१, मोगलपुरा, संगमनेर), सय्यद युनूस मन्सूर (वय २४, गवंडीपुरा मस्जिदजवळ, संगमनेर), मोसीन इमाम शेख (वय ३५, रा. जम्मनपुरा, संगमनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच जुबेर हॉटेलवाला, जुबेर हॉटेलमधील कर्मचारी, निसार खिचडीवाला, जाकीर खान, मोहम्मद हानिफ रशीद शेख, अरबाज साजिद (सर्व रा. संगमनेर) हे अद्यापही पसार आहेत. त्यांच्याविरोधात पोलीस मुख्यालयातील पोलीस कॉस्टेबल सलमान मुक्तार शेख यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अटक केलेल्या चौघांना शनिवारी (दि. ८) न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख अधिक तपास करीत आहेत.