कोपरगावातील बेकायदा कत्तलखाने प्रकरणी चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:18 PM2018-03-14T13:18:07+5:302018-03-14T13:19:36+5:30
शहरातील बेकायदा कत्तलखाने प्रकरणी फरार असलेल्या आणखी चार आरोपींना मंगळवारी अटक केली. आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता १८ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : शहरातील बेकायदा कत्तलखाने प्रकरणी फरार असलेल्या आणखी चार आरोपींना मंगळवारी अटक केली. आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता १८ झाली आहे.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना शहरात संजयनगर व आयशा कॉलनी भागात राजरोसपणे अनाधिकृत कत्तलखाने सुरू होते. या कत्तलखान्यांवर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहर पोलिसांसमवेत छापे टाकले. या कारवाईत सुमारे ८९ लाख रूपये किमतीचे १९ हजार ५०० किलो गोमांस, ३३७ जिवंत गोवंश जनावरे, कातडी, चरबी, तुप व इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी महाराष्ट्र गोहत्या प्रतिबंधक कायद्यान्वये ११ जणांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटकही झाली. मात्र काही आरोपी फरार झाल्याने त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. फरार आरोपींपैकी प्रथमत: ३ व आता जनावरांचे व्यापारी सलीम नजीर पिंजारी(वय-३७), रा. इंदिरानगर, रफिक युसूफभाई कुरेशी(वय-५५), रा. मुंबई, हल्ली संजयनगर, इरफान खालीक कुरेशी(वय-२४), रा. संजयनगर व सत्तार निसार कुरेशी(वय-२४), सुभाषनगर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या आता १८ झाली आहे. आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी सांगितले.