दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 04:54 PM2019-11-02T16:54:35+5:302019-11-02T16:54:56+5:30
राहुरी येथील मुळानगर परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार अट्टल दरोडेखोरांचा राहुरी पोलिसांनी अटक केले. एकजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे.
राहुरी : राहुरी येथील मुळानगर परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार अट्टल दरोडेखोरांचा राहुरी पोलिसांनी अटक केले. एकजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. आरोपींकडून २० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना माहिती मिळाली. मच्छिंद्र गोरक्षनाथ सगळगिळे (रा.टाकळीमियाँ) हा मुळा धरणाजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीच्या रोडवर इतर साथीदारांसह दरोडा घालण्याच्या उद्देशाने सदर भागात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके या ठिकाणी छापा टाकण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बागुल, पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव, हवालदार आयुब शेख, डी.के.आव्हाड यांनी परिसरात सापळा लावला. पोलीस पथकाने साडेनऊ वाजता छापा घातला. मात्र ते पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले. यावेळी पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यातील चार जणांच्या मुसक्या आवळल्या.
मच्छिंद्र गोरक्षनाथ सगळगिळे, बंटी उर्फ निल विजय गायकवाड (वय ३० वर्षे), जालिंदर जगन्नाथ सगळगिळे (वय २३ वर्षे) तिघे रा.- टाकळीमियाँ, बापू उर्फ देवा उर्फ गवजी उर्फ अशोक सखारात शिंगाडे (वय ३० वर्षे, रा. वरवंडी तालुका) असे अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. सचिन उर्फ किरण दत्तु शेलार (रा. मुसळवाडी) हा अंधाराचा अंदाज घेऊन पसार झाला आहे. त्यांच्या ताब्यातून लोखंडी कोयता,चाकू, लोखंडी रॉड तसेच मोटारसायकल असा एकूण २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बागुल हे करीत आहे.