वाळू उपसा करणार्‍या चार बोटी पेटविल्या

By Admin | Published: May 21, 2014 12:18 AM2014-05-21T00:18:38+5:302024-10-11T14:46:48+5:30

श्रीगोंदा : महसूल विभागातील पथकाने शस्त्रधारी पोलिसांच्या मदतीने हिंगणी शिवातील घोडनदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करणार्‍या चार बोटी पेटवून दिल्या

The four bowl sand sandstorms are lit | वाळू उपसा करणार्‍या चार बोटी पेटविल्या

वाळू उपसा करणार्‍या चार बोटी पेटविल्या

श्रीगोंदा : महसूल विभागातील पथकाने शस्त्रधारी पोलिसांच्या मदतीने हिंगणी शिवातील घोडनदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करणार्‍या चार बोटी पेटवून दिल्या. ही कारवाई मंगळवारी केली. हिंगणी शिवारातील वाळू तस्करांची चांगलीच दादागिरी वाढली होती. घोड नदी पात्रात चार बोटीद्वारे बेकायदा वाळू उपसा चालविला होता. महसूल विभागाने अनेक वेळा समज दिली, परंतु वाळू तस्करांनी बेकायदा वाळू उपसा चालू ठेवला. प्रांताधिकारी संतोष भोर यांनी केलेल्या आदेशानुसार महसूल विभागातील पथकाने मंगळवारी सकाळी १० ते ५ वाजेदरम्यान डिझेल ओतून बोटी पेटवून दिल्या. पोलीस दिसताच बोटी मालक व मजुरांनी धूम ठोकली. पथकात मंडलाधिकारी संजय जगताप, संजय मोरे, बेलवंडीचे कामगार तलाठी काळे, घारगावचे तलाठी मेहत्रे हे सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी) धाडसी कारवाई महसूल विभागाने चारबोटी पेटवून दिल्याने वाळू तस्करांना १२ लाखास चंदन बसले. या वर्षातील महसूल विभागाने सर्वात धाडसी कारवाई केली असे मानले जाते.

Web Title: The four bowl sand sandstorms are lit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.