गावठी कट्ट्यासह चौघे पोलिसांच्या जाळ्यात; जिवंत काडतुसेही हस्तगत, साकुर येथील प्रकार
By शेखर पानसरे | Published: September 24, 2023 10:42 AM2023-09-24T10:42:39+5:302023-09-24T10:42:59+5:30
पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करीत आहेत.
घारगाव : संगमनेर तालुक्यातील साकुर ते टाकळी ढोकेश्वर रस्त्यावर मांडवे बुद्रुक परिसरात गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने थांबलेल्या तिघांना घारगाव पोलिसांच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि.२३ ) सायंकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान करण्यात आली. संतोष काशिनाथ कुटे (वय-३२,रा. मांडवे बु.) ,शिवाजी बाबुराव कुदनर (वय-२७, रा. शिंदोडी ),संतोष शेवराज बर्डे (वय-२८, रा. शिंदोडी), रणजित बापू धुळगंड (रा. मांडवे बु.) असे अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.
साकुर परिसरातील साकुर ते टाकळी ढोकेश्वर रस्त्यावर मांडवे बुद्रुक परिसरात तिघेजण बसलेले असून एकाच्या कमरेला गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर,पोलीस नाईक चौधरी आदींच्या पथकाने सापळा रचला. सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. त्यांचेकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, मॅक्झीनसह तीन जिवंत काडतुसे असा २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. अधिक चौकशी केली असता गावठी कट्टा व काडतुसे रणजित बापू धुळगंड (रा. मांडवे बु., ता. संगमनेर) याचेकडून खरेदी केले असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करीत आहेत.