दोन अपघातात चार ठार

By Admin | Published: December 20, 2015 11:15 PM2015-12-20T23:15:00+5:302015-12-20T23:22:33+5:30

चांदेकसारे : मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत कारमध्ये असलेले दोन सख्खे भाऊ ठार झाल्याची घटना कोपरगाव ते संगमनेर रस्त्यावर शनिवारी रात्री घडली़

Four killed in two accidents | दोन अपघातात चार ठार

दोन अपघातात चार ठार

चांदेकसारे : मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत कारमध्ये असलेले दोन सख्खे भाऊ ठार झाल्याची घटना कोपरगाव ते संगमनेर रस्त्यावर शनिवारी रात्री घडली़ शांताराम गिताराम खरात (वय ४०) व संजय गिताराम खरात (वय ३३, राहणार चांदेकसारे) अशी मयत व्यक्तींची नावे आहेत़
घटनेबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, चांदेकसारे येथील रहिवासी शांताराम खरात व संजय खरात हे त्यांच्या एमएच ०४ ईजी ६९१० या वाहनामधून जात होते़ सागर भोसले हा चालक होता़ त्यांची कार चांदेकसारे येथील भैरवनाथ मंदिराजवळ असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या एमएच १५ ईजी ७४७७ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली़ या अपघातात शांताराम व संजय खरात जागीच ठार झाले़ अपघाताबाबत सुधाकर रामजी खंडीझोड यांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ त्यावरून ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पी़ एऩ बाबर करीत आहेत़
(वार्ताहर)
पळवे : भरधाव टेम्पोची धडक बसून दोन वृध्द ठार झाले. नगर -पुणे महामार्गावरील पळवे भागात शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये नामदेव बाबुराव फटांगडे (वय ८५) व राधुजी रखमाजी पोटघन (वय ८०) यांचा समावेश आहे. जातेगाव फाट्यावरुन गावाकडे जाण्यासाठी हे वृध्द रस्ता ओलांडत असताना पुण्याहून नगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या टेम्पोने (क्र. एमएच-०४-जीसी ६४८८) जोराची धडक दिल्याने हे दोघे बाजूला फेकले गेले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत दवाखान्यात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद विजय दादाभाऊ पोटघन रा. जातेगाव यांनी सुपा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो चालक महेश वासुदेव कलमेष्ट यास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास हवालदार पठाण करीत आहेत. जातेगाव घाटात अज्ञात वाहनाची धडक बसून नरेश मौर्य (वय २८, रा. शिरुर) हा तरुण जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: Four killed in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.