जिल्ह्यात आणखी चार कोरोनाबाधित,दोन एस. टी. च्या चालकांना कोरोना, नवनागापूर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 08:45 PM2020-06-18T20:45:33+5:302020-06-18T20:45:41+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात आणखी चार कोरोनाचे रुग्ण आढळून आले. सकाळी तीन आणि सायंकाळी आणखी चार रुग्ण आढळून आले. त्यापैकी दोन जण हे एस. टी. महामंडळात चालक आहेत. दिवसभरात आज सात रुग्ण आढळून आले आहेत.
अहमदनगर : जिल्ह्यात आणखी चार कोरोनाचे रुग्ण आढळून आले. सकाळी तीन आणि सायंकाळी आणखी चार रुग्ण आढळून आले. त्यापैकी दोन जण हे एस. टी. महामंडळात चालक आहेत. दिवसभरात आज सात रुग्ण आढळून आले आहेत.
पुण्याहून निमगाव पागा (संगमनेर) येथे आलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीला कोरोनची बाधा झाली आहे. कोल्हेवाडी (संगमनेर) येथील१८ वर्षीय युवती बाधित आढळून आली आहे. माणिकदौंडी (ता. पाथर्डी) येथील ३३ वर्षीय व्यक्तीला कोरोनची लागण झाली आहे. कुर्ला नेहरूनगर, मुंबई येथे चालक म्हणून काम करत होता. नगर तालुक्यातील भोयरे पठार येथील ३३ वर्षीय व्यक्तिलाही कोरोणाची लागण झाली आहे. ही व्यक्तीही मुंबई येथे चालक म्हणून काम करीत होती.
आज सकाळी ०३ बाधित व्यक्ती आढळल्या. पुण्याहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. कांदिवली (मुंबई) येथून प्रवास करून पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आलेल्या 68 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित झाली. संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील 34 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह. आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने उपचारासाठी झाला होता दाखल. याशिवाय, संगमनेर येथील दोघा जणांचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत १४ जून रोजी पॉझिटिव्ह आला होता. तसेच नवनागापूर अहमदनगर येथील एका व्यक्तीचा अहवाल नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पॉझिटिव्ह आला आहे. या तीन रुग्णांची आयसीेएमआर पोर्टल वर जिल्ह्याच्या संख्येत नोंद झाली आहे. त्यामुळे या तीन रुग्णांची भर जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत पडली आहे.