कोरोना उपचारासाठी चार ते नऊ हजार रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:02 PM2020-07-14T12:02:27+5:302020-07-14T12:03:23+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील ज्या खासगी रुग्णालयांमध्ये कोविड-१९ आजारावर उपचार करण्यात येत आहेत, अशा रुग्णालयांनी रुग्णाकडून राज्य शासनाने ठरवून दिलेलेच शुल्क आकारावे आणि सदर दरफलक दर्शनी भागात लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. यानुसार खासगी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी दर आकारणीचे तीन स्तर ठरविण्यात आले आहेत़ यामध्ये दर दिवसाला जास्तीत जास्त ४०००, ७५०० व ९००० रुपये असे दर राहणार आहेत.
अहमदनगर : जिल्ह्यातील ज्या खासगी रुग्णालयांमध्ये कोविड-१९ आजारावर उपचार करण्यात येत आहेत, अशा रुग्णालयांनी रुग्णाकडून राज्य शासनाने ठरवून दिलेलेच शुल्क आकारावे आणि सदर दरफलक दर्शनी भागात लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. यानुसार खासगी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी दर आकारणीचे तीन स्तर ठरविण्यात आले आहेत़ यामध्ये दर दिवसाला जास्तीत जास्त ४०००, ७५०० व ९००० रुपये असे दर राहणार आहेत.
जिल्ह्यात सध्या जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्येही कोरोनावर उपचार होत आहेत़ अशा रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होऊ नये तसेच अवास्तव शुल्क त्यांच्याकडून आकारले जाऊ नये, यासाठी राज्य शासनाने अशा रुग्णालयांसाठी उपचाराच्या अनुषंगाने दर निश्चित करून दिले आहेत. या रुग्णालयांनी कोविड-१९ उपचाराच्या संदर्भातील दरपत्रक रूग्णालयाच्या दर्शनी भागात लावावेत. जेणेकरून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्याची माहिती होऊ शकेल. तसेच महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत निकषानुसार पात्र असणाºया रुग्णांवर मोफत उपचार करावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी साधे बेड, फक्त आॅक्सिजनची सुविधा आणि अतिदक्षता विभागातील बेड यासाठी दर निश्चित केले आहेत.
त्यामुळे या आदेशानुसार खासगी रुग्णालयांनी सेवा देणे बंधनकारक आहे़ सध्या या रुग्णालयांना तेथील सुविधांनुसार जे दर ठरवून दिले आहेत. या दरामध्ये रुग्णाचे मॉनिटरिंग, सीबीसी तसेच युरीन तपासणी, एचआयव्ही स्पॉट, अॅण्टी एचसीव्ही, युएसजी, २ डी एको, एक्स रे, ईसीजी, बेड चार्जेस, नर्सिंग चार्जेस, रायल्स ट्यूव, युरीनरी ट्रॅक्ट कॅथेटरायझेशन आदींचा समावेश आहे. हे दर ३१ डिसेंबर, २०१९ च्या रॅक रेटनुसार आकारावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, कोविड चाचणीसाठी राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दराने आकारणी करता येईल. त्यापेक्षा जास्त शुल्क घेता येणार नाही. उपचारासाठी वापरले जाणारे इम्युनोग्लोबुलिन्स, मेरोपेनेम, पॅरेन्ट्राल न्युट्रीशन, टॉसिलीझुमॅब आदी औषधी त्यांच्या एमआरपीनुसार स्वतंत्रपणे शुल्क आकारले जाईल. तसेच विविध चाचण्या जसे की, एमआरआय, सीटी स्कॅन, पीईटी किंवा रुग्णांवर उपचारांसाठी प्रयोगशाळेत केल्या जाणाºया आवश्यक चाचण्यासाठीचे शुल्कही स्वतंत्रपणे आकारले जाईल. त्याचा या दर आकारणीत समावेश नाही.
अशी असेल आकारणी पद्धत
सर्वसाधारण वॉर्ड आणि आयसोलेशनमध्ये रुग्ण असेल तर प्रतिदिवशी ४ हजार रुपये, आयसीयूमध्ये रुग्ण असेल आणि त्याला व्हेंटिलेटरची आवश्यकता नसेल तसेच आयसोलेशनमध्ये असेल तर प्रतिदिवशी ७ हजार ५०० रुपये़ आयसीयू वॉर्ड (व्हेंटिलेटरसह) आणि आयसोलेशन यासाठी प्रतिदिवशी ९ हजार रुपये शुल्क असे दर निश्चित करण्यात आलेले आहेत़ यामध्ये पीपीई कीट, व्रान्कोस्कोपीक प्रोसीजर्स, बायोप्सीज, असायटीक/प्युरल टॅपिंग, सेंट्रल लाईन इन्सर्शन, केमोपोर्ट इन्सर्शन आदींच्या दर आकारणीचा समावेश नाही.