श्रीरामपुरात चार टन गोमांस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:23 PM2018-05-03T16:23:57+5:302018-05-03T16:25:06+5:30
श्रीरामपूर : शहरातील प्रभाग दोनमध्ये परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४ टन गोमांस जप्त करण्यात आले. बाजारभावानुसार त्याची ...
श्रीरामपूर : शहरातील प्रभाग दोनमध्ये परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४ टन गोमांस जप्त करण्यात आले. बाजारभावानुसार त्याची किंमत ६ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस आल्याचे समजताच यातील आरोपी अश्पाक मिया कुरेशी, जफर कुरेशी, आसिफ कुरेशी, आक्रम सिद्धीक कुरेशी (रा.सर्व कुरेशी मोहल्ला, श्रीरामपूर) हे पसार झाले. त्यांच्या अन्य चार साथीदारांनीदेखील पोलिसांना गुंगारा दिला. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पांढऱ्या रंगाच्या पीक अप वाहनातून (एम.एच. १६, ए.वाय.३६५) २९ जनावरांचे गोमांस या ठिकाणी आणण्यात आले. ४ हजार शंभर किलो वजनाच्या या मांसाची किंमत ६ लाख रुपये आहे. वाहनासह ११ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
बुधवारी सायंकाळी शहर पोलिसांनी ही कारवाई केली. खबºयाकडून मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या पथकाने छापा टाकत हा माल जप्त केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोमांस मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. मांसाची तपासणी केली जाणार आहे.
आठवडे बाजारातून या जनावरांची खरेदी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, जोसेफ साळवी, जालिंदर लोंढे, सुधीर हापसे आदींचा समावेश होता.