नाशिक-पुणे महामार्गावर चार वाहनांचा भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 02:22 PM2020-11-07T14:22:21+5:302020-11-07T14:23:37+5:30

नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारात एका टेम्पोसह तीन कारचा भीषण अपघात झाला आहे. ही सर्व वाहने पुण्याकडून नाशिकच्या दिशेने निघाली होती. शनिवारी ( ७ ऑक्टोंबर) दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

Four vehicles collided on Nashik-Pune highway | नाशिक-पुणे महामार्गावर चार वाहनांचा भीषण अपघात

नाशिक-पुणे महामार्गावर चार वाहनांचा भीषण अपघात

संगमनेर : नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारात एका टेम्पोसह तीन कारचा भीषण अपघात झाला आहे. ही सर्व वाहने पुण्याकडून नाशिकच्या दिशेने निघाली होती. शनिवारी ( ७ ऑक्टोंबर) दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी व शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमींना रुग्णालयांमध्ये उपचारात दाखल केले असून त्यांची नावेेेे अद्याप समजली नाहीत. रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Four vehicles collided on Nashik-Pune highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.