दरोड्याच्या तयारीतील चौघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:19 AM2021-03-28T04:19:52+5:302021-03-28T04:19:52+5:30
संगमनेर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांपैकी तिघांना संगमनेर शहर पोलिसांच्या गस्ती पथकाने पाठलाग करून पकडले. यातील तीन जण ...
संगमनेर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांपैकी तिघांना संगमनेर शहर पोलिसांच्या गस्ती पथकाने पाठलाग करून पकडले. यातील तीन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. ही कारवाई शनिवारी (दि. २७) पहाटेच्या सुमारास समनापूर बाह्यवळण ते पुणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. पळून गेलेल्या एकाला शनिवारी दुपारी पकडण्यात आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विक्रम रामनाथ घोडेकर (वय २०) अजित अरुण ठोसर (वय २०) (दोघेही रा. पंपिंग स्टेशन, कासारा-दुमाला रस्ता, संगमनेर), सर्फराज राजू शेख (वय १९, रा. लालतारा कॉलनी जवळ, अकोले नाका, संगमनेर) कलीम अकबर पठाण, हलीम अकबर पठाण व आसिफ शेख (सर्व रा. जमजम कॉलनी, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या सहा जणांची नावे आहेत. यातील कलीम पठाण व आसिफ शेख हे दोघे पसार असून हलीम पठाण याला दुपारी पकडण्यात आले.
वरील गुन्हा दाखल झालेल्या आरोपींवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहे. त्यांच्याकडील दुचाकी वाहन व तीन कोयते, एक गिलोर असा ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
---------
पाठलाग करून पकडले
हलीम पठाण हा एका भंगाराच्या दुकानात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस त्याला पकडण्यासाठी गेला असता तो तेथून पळून जाऊ लागला. पाठलाग करत त्याला समनापूर येथील गणपती मंदिरासमोर पकडण्यात आले.