विरोधकांकडून फुकटचे श्रेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2016 12:59 AM2016-10-20T00:59:12+5:302016-10-20T01:27:19+5:30

शिर्डी : आमच्या कार्यकाळात प्रसिध्दी ऐवजी केवळ शहर विकासाला प्राधान्य दिले. आम्ही केलेली कामे पहावत नसल्याने रस्ते विकास कामांचे उद्घाटन करुन झालेल्या कामांचे

Free credit from opponents | विरोधकांकडून फुकटचे श्रेय

विरोधकांकडून फुकटचे श्रेय


शिर्डी : आमच्या कार्यकाळात प्रसिध्दी ऐवजी केवळ शहर विकासाला प्राधान्य दिले. आम्ही केलेली कामे पहावत नसल्याने रस्ते विकास कामांचे उद्घाटन करुन झालेल्या कामांचे श्रेय विरोधक घेत असल्याचा आरोप नगराध्यक्षा अनिता जगताप यांनी केला.
नगराध्यक्षा अनिता जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १५ मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी मनोरंजन कार्यक्रम तसेच लकी ड्रॉ काढून १५ पैठणी साड्यांचे वाटप केले, उर्वरित महिलांना गृहउपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले.
यावेळी जगताप म्हणाल्या की, आमच्या हाती सत्ता आल्यानंतर राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन विविध रखडलेली विकाम कामे मंजूर करुन घेतली. यासाठी पाठपुरावा आम्ही केला व बोर्ड लावून उद्घाटन करण्याचे काम विरोधक करत आहेत. फुकटच्या प्रसिध्दीसाठी विरोधकांचा खटाटोप हास्यास्पद आहे. नगरपंचायतमध्ये सत्तांतर झाल्यानंतर जाणीवपूर्वक कचरा प्रश्न निर्माण केला. शेजारील गावांना पुढे करत कचऱ्यास विरोध करण्यास भाग पाडून शिर्डीकरांचे आरोग्य धोक्यात घालण्याचे पाप विरोधकांनी केले. निवडणुका डोळयासमोर ठेवून विरोधक विकास कामांचे थोतांड माजवत असल्याचा आरोप जगताप यांनी केला़
शहरात २२ कोटी रुपयांच्या शीव रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम चालू केले, शहरात नवीन एलईडी पथदिवे बसविले, कचरा समस्या कायमची सोडविण्यासाठी संस्थानच्या मदतीने काम सुरू आहे, विरोधक २३ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केल्याचे सांगतात पण ती योजना कुठे आहे, असा सवाल नगराध्यक्षा जगताप यांनी उपस्थित केला़ उलट विद्यमान राज्य सरकार अमृत सिटी योजनेतून नवीन पाणी पुरवठा योजना करत आहे़ या संदर्भात नगरविकास राज्यमंत्री दीपक केसरकर व सचिव म्हैसकर यांच्याबरोबर विजय जगताप, राजेंद्र गोंदकर, कमलाकर कोते यांनी बैठक घेऊन ही ३३ कोटींची योजना मंजूर करून घेतली असून लवकरच त्याबाबत प्रक्रिया सुरू होईल असेही त्यांनी सांगितले़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Free credit from opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.