महापालिकेकडून अडीच हजार जणांवर मोफत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:20 AM2021-04-22T04:20:52+5:302021-04-22T04:20:52+5:30
अहमदनगर : शहरात अत्यंविधीसाठी चार ते पाच हजार रुपये खर्च येतो. मात्र कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांकडून एक रुपयाही न ...
अहमदनगर : शहरात अत्यंविधीसाठी चार ते पाच हजार रुपये खर्च येतो. मात्र कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांकडून एक रुपयाही न घेता महापालिकेने गेल्या वर्षभरात अडीच हजार जणांवर मोफत अंत्यसंस्कार केले. नातेवाइकांच्या अनुपस्थितीत अत्यंसंस्कार करून अस्थी सुरक्षित ठेवल्या जात असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाने कहर माजविला आहे. मृत्यूचे तांडव सुरूच आहे. दररोज ५० ते ५५ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागत आहे. गेल्या मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण नगरमध्ये आढळला होता. कोेरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचा अंत्यविधी कुणी करायचा, असा प्रश्न निर्माण झाला होता. जिल्हा प्रशासनाने ही जबाबदारी महापालिकेकडे सोपविली आहे. मयत व्यक्ती ग्रामीण भागातील असली तरी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात न देता येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. महापालिका गेल्या वर्षभरापासून ही जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहे. महापालिकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक केली. ही संस्था गेल्या वर्षभरापासून अहोरोत्र अत्यंविधीचे काम करत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे नातेवाईक अंत्यविधीसाठी उपस्थित नसतात. नातेवाइकांच्या अनुपस्थितीत महापालिका हे कार्य चोखपणे करत असून, महापालिकेला अत्यंविधीसाठी दररोज ८ ते १० टन लाकूड लागते. हे लाकूड अंत्यसंस्कार सहायक मंडळाकडून पुरविले जाते. विद्युतदाहिनी कमी पडत असल्याने सध्या २० ते २२ मृतदेहांवर लाकडावर अत्यंविधी केला जात आहे. कर्मचारी जीव धोक्यात घालून अंत्यविधी पार पडत असून, महापालिकेकडून त्यांना पीपीई किटसारख्या सुविधा पुरविल्या जात आहेत. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याने रात्री उशिरापर्यंत अंत्यविधीच काम सुरू असते. सकाळीच जिल्हा रुग्णालयातून फोन येतो. सकाळपासून हे काम सुरू होते. ते रात्री उशिरापर्यंत सुरू राहते. नातेवाइकांकडून एका रुपयाही न घेता अंत्यसंस्कार केले जात आहेत.
.....
वर्षभरात ९ लाख रुपये खर्च
कोरोनाच्या पहिल्या लाटेत मार्च २०२० मध्ये महापालिकेने मोफत अंत्यविधीचा उप्रकम हाती घेतला. मार्च २०२० ते एप्रिल २०२१ या काळात २ हजार ३८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ९ लाख रुपये खर्च आला. लाखो रुपये खर्चून महापालिका कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करत आहे.
.....
असा येतो खर्च
विद्युत दाहिनीसाठी-१ हजार रुपये
कर्मचाऱ्यांचे मानधन- २८००
शववाहिका चालक- ५००
....
दररोज ८ ते १० टन लाकडाची गरज
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढल्याने लाकडावर अंत्यविधी केले जात असून, त्यासाठी दररोज ८ ते १० टन लाकूड लागते. हे लाकूड अंत्यसंस्कार साहाय्यता मंडळाकडून उपलब्ध करून दिले जात असून, त्याबदल्यात महापालिका संबंधित संस्थेला प्रति व्यक्ती २ हजार ४० रुपये, याप्रमाणे बिल अदा करत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
....
नेट फोटो
मनी
१९ मनी फॉर फ्युनरल डमी