जवानांच्या मुलांना अभिनवमध्ये मोफत शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:27 AM2021-02-05T06:27:05+5:302021-02-05T06:27:05+5:30
प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपुरुषांच्या, सैनिकांच्या व राष्ट्राचा पोशिंदा असणारा शेतकरी यांच्या त्यागाची जाणीव असावी व त्यांचा अभिमान असावा, राष्ट्रीय एकात्मता ...
प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपुरुषांच्या, सैनिकांच्या व राष्ट्राचा पोशिंदा असणारा शेतकरी यांच्या त्यागाची जाणीव असावी व त्यांचा अभिमान असावा, राष्ट्रीय एकात्मता राखावी, असे नवले यांनी सांगितले. कार्यक्रमात अविनाश मुठे व यश नाईकवाडी या दोन विद्यार्थ्यांनी चित्त थरारक घोडेस्वारी करत तिरंग्याला सलाम केला. याप्रसंगी भारतमातेची सेवा करणाऱ्या अकोले तालुक्यातील वीर जवानांचा सन्मान करण्यात आला. त्यात जम्मू- काश्मीरला सैन्यदलात कार्यरत असलेले सुजित सोमनाथ बाळसराफ, श्रीनगर येथे कार्यरत दत्तू दगडू मंडलिक, सुदर्शन नामदेव लांडे, लेह लडाख सिमेवर कार्यरत असलेले विश्वास भगवान कर्निक, सुरज मोहन भुजबळ, अहमदाबाद येथे कार्यरत किरण भुजबळ यांचा सहपरिवार सत्कार करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब नाईकवाडी, मंदाबाई नवले, विक्रम नवले, शिवाजी चौधरी, डॉ. जयश्री देशमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन हेमंत मंडलिक यांनी केले.