नेत्र तपासणी शिबिरात ८८ रुग्णांची मोफत तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:22 AM2021-03-10T04:22:35+5:302021-03-10T04:22:35+5:30
शिबिरात ८८ रुग्णांची तपासणी डॉ.मनीषा कोरडे, डॉ.कविता आरगडे यांनी केली. पैकी ४६ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले. या रुग्णांची ...
शिबिरात ८८ रुग्णांची तपासणी डॉ.मनीषा कोरडे, डॉ.कविता आरगडे यांनी केली. पैकी ४६ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले.
या रुग्णांची पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सौंदाळ्यात शिबिर होणार आहे.
यावेळी शरद आरगडे, गोविंद आरगडे, श्रीमती सुभद्राबाई गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास परसराम आरगडे, बाळासाहेब आरगडे, कारभारी आरगडे, लक्ष्मण चामुटे, ज्ञानेश्वर आरगडे, सचिन आरगडे, आशिनाथ आरगडे, विठ्ठल आरगडे, बाळासाहेब बोधक, कल्याण आरगडे, दत्तात्रय आरगडे, संतोष आरगडे, भागवत आरगडे, सुदाम आरगडे, गणेश आरगडे, आझाद आरगडे, वसंत आरगडे व ग्रामस्थ उपस्थित होते.