कोरेगव्हाण येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:21 AM2020-12-31T04:21:36+5:302020-12-31T04:21:36+5:30
श्रीगोंदा : आनंदऋषीजी नेत्रालय व फिनिक्स सोशल फाउंडेशन-शिवनेरी प्रतिष्ठन यांच्या वतीने कोरेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथे मोफत नेत्र तपासणी व ...
श्रीगोंदा : आनंदऋषीजी नेत्रालय व फिनिक्स सोशल फाउंडेशन-शिवनेरी प्रतिष्ठन यांच्या वतीने कोरेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथे मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
डोळ्यांचे महत्व दृष्टी नसलेल्या व्यक्तीला समजते. दृष्टी असेल तरच सृष्टी आहे. दृष्टीहिनांना ही दृष्टी दाखवण्यासाठी ग्रामीण भागात शिवनेरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी व अल्प दरातील मोतीबिंदू शिबिराचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. कोरेगव्हाणसारख्या ग्रामीण भागात या नेत्र तपासणी शिबिरांची अत्यंत गरज आहे, अशी गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या माजी सभापती ॲड. कमल सावंत यांनी काढले. यावेळी दिनकर पंधरकर, महेंद्र वाखारे, अतुल लोखंडे, जालिंदर बोरूडे, डॉ. संजय शिंदे, आर्यन कराळे, किरण कवडे, सहाय्यक स्वप्नील गव्हाणे आदी उपस्थित होते.