गरजूंची मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:21 AM2021-04-11T04:21:10+5:302021-04-11T04:21:10+5:30
शनिवार व रविवारी संचारबंदी असल्याने शुक्रवारी (दि.९) नागरदेवळे (ता. नगर) येथे हे शिबिर झाले. कोरोनाचे सर्व नियम पाळून रुग्णांची ...
शनिवार व रविवारी संचारबंदी असल्याने शुक्रवारी (दि.९) नागरदेवळे (ता. नगर) येथे हे शिबिर झाले. कोरोनाचे सर्व नियम पाळून रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तर काही ज्येष्ठ नागरिकांवर मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शिबिराचे उद्घाटन क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी नागरदेवळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. भारतकुमार कोठुळे, फिनिक्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, डॉ. विशाल घंगाळे, डॉ. कळमकर, सुशील गाडेकर, किरण कवडे, मिश्रीलाल पटवा, आर्यन कराळे, साई धाडगे आदींची उपस्थिती होती. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. कोठुळे म्हणाले शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनीच फिनिक्स फाउंडेशनचे सामाजिक कार्य चालू आहे. जालिंदर बोरुडे यांनी शासकीय नोकरी सांभाळताना समाजसेवेचा घेतलेला वसा नि:स्वार्थ भावनेने पार पाडत आहे. कोरोनाच्या संकटकाळात फिनिक्स फाउंडेशन करीत असलेल्या रुग्णसेवेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचलन गौरव बोरुडे यांनी केले. आभार सौरभ बोरुडे यांनी मानले.
फोटो मेलवर आहे
ओळी-
फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने नागरदेवळे येथे गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.