१५ वर्षांपासून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:09 AM2021-01-24T04:09:39+5:302021-01-24T04:09:39+5:30

दहावी, बारावीच्या निकालानंतर सलग महिनाभर आरोटे विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करत असतात. यंदा इंजिनिरिंगच्या सीईटी मार्कांमध्ये पर्सेटाइल आल्याने अनेक पालकांमध्ये ...

Free guidance to students for 15 years | १५ वर्षांपासून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन

१५ वर्षांपासून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन

दहावी, बारावीच्या निकालानंतर सलग महिनाभर आरोटे विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करत असतात. यंदा इंजिनिरिंगच्या सीईटी मार्कांमध्ये पर्सेटाइल आल्याने अनेक पालकांमध्ये मोठी संभ्रमावस्था आहे. अभियांत्रिकी, फार्मसी प्रवेश प्रक्रियेत राज्य पातळीवरील मिळणाऱ्या मेरिट सीईटी, जेईई, नीट यानुसार ऑप्शन फॉर्म भरणे ही खूप महत्त्वाची प्रक्रिया असून, ती संपूर्णपणे पारदर्शक असते. परंतु विद्यार्थी व पालक यांनी सविस्तर समजून न घेतल्यास आपणास मिळणारे महाविद्यालय किंवा कोर्स चुकीचा होऊ शकतो. तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया व्यवस्थित समजून घेणे गरजेचे असते. त्यांना टीएफडब्लूएससारख्या योजनेचा लाभ मिळू शकतो. टीएफडब्लूएस ही योजना अनेकांना माहीत नसते. यंदा अभियंता आरोटे यांच्या मार्गदर्शनाचा १८९ विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. मेडिकल, इंजिनिरिंग, डिप्लोमा, फार्मसी अशा उच्च शिक्षणासाठी ते सातत्याने मार्गदर्शन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. याचा फायदा विशेषकरून ग्रामीण भागातील मुलींना झाला आहे. आलेल्या प्रत्येकाचे परिपूर्ण समाधान करताना चहा-पाणी देऊन प्रत्येकाचे आदरातिथ्य करण्याची परंपरा त्यांच्या पत्नी साधना आरोटे यांनी कायम जपली आहे.

Web Title: Free guidance to students for 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.