श्रीरामपूर शहरात मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:31 AM2021-02-23T04:31:31+5:302021-02-23T04:31:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : क्रस्ना डायग्नोस्टिक्स, लोकसेवा विकास आघाडी व डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्यातर्फे नागरिकांसाठी बुधवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : क्रस्ना डायग्नोस्टिक्स, लोकसेवा विकास आघाडी व डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्यातर्फे नागरिकांसाठी बुधवारी मोफत कोरोना प्रतिपिंड तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुळा-प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे यांनी दिली.
आगाशे सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्याकरिता दहा रुपये नावनोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे. यावेळी तपासणीसाठी येताना नागरिकांनी आधारकार्ड आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिपिंड (अँटिबॉडी) तपासणी ही कोरोना आजार झाला होता किंवा नाही, याची चाचणी करण्यासाठी केली जाते. कोरोना आजार होऊन गेलेल्या व्यक्तीच्या शरीरात प्रतिपिंडे तयार होतात. त्याचे प्रमाण याद्वारे समजते. या विनामूल्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिद्धार्थ मुरकुटे यांनी केले आहे. यावेळी तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याची खबरदारी घ्यावयाची आहे.