मोफत योग व प्राणायाम वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:42+5:302021-06-30T04:14:42+5:30
अहमदनगर : सध्याच्या कोरोनाच्या काळात प्रत्येकाची प्रतिकार शक्ती वाढावी व कोरोनापासून संरक्षण व्हावे म्हणून योग विद्या धाम अहमदनगरच्यावतीने ...
अहमदनगर : सध्याच्या कोरोनाच्या काळात प्रत्येकाची प्रतिकार शक्ती वाढावी व कोरोनापासून संरक्षण व्हावे म्हणून योग विद्या धाम अहमदनगरच्यावतीने १ जुलै ते ३० जुलैपर्यंत योग प्रवेश वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ६ ते ७ व दुपारी ५ ते ६ या वेळेत हे वर्ग मोफत होणार आहेत, अशी माहिती योग विद्या धामचे अध्यक्ष डॉ. सुंदर गोरे यांनी दिली. योगाचे वर्ग ऑनलाईन तसेच चिंतामणी कॉलनी, भिस्तबाग रोड, सिध्दीबाग तसेच नवले हॉल, गुलमोहर रोड येथे ऑफलाईन पद्धतीने घेतले जाणार आहेत. या वर्गात वेगवेगळ्या प्रकारच्या
३९ योगासने, १२ प्रकारच्या पूरक हालचाली, सूर्यनमस्कार व ६ प्रकारचा श्वसनाचे अभ्यास शिकवले जाणार आहेत. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी व प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी हे वर्ग अत्यंत उपयुक्त आहेत. तरी या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे आवाहन योग विद्या धामचे राजन कुमार यांनी केले आहे.